एलन मस्कची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला लवकरच भारतात दाखल होऊ शकते. टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी 17 मे रोजी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत कंपनीने भारतात इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी उत्पादन युनिट स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, अद्याप याबाबत सरकार टेस्ला किंवा एलन मस्क यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याआधी गेल्या वर्षीही टेस्लाने भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर कंपनी आणि सरकारमध्ये चर्चा होऊ शकली नाही.