मच्छिमारांचे जीवन धोक्यातस्थानिक प्रशासनाचा कानाडोळा ?

महाराष्ट्रात मोठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणून ओळखली जाणारी जड रासायनिक उद्योगिक कारखाने असलेली तारापूर व बोईसर
औद्योगिक विकास महामंडळ ह्यानी प्रक्रिया न करता सोडलेल्या पाण्यामुळे तारापूर ,दांडी,मुरबे ,ह्यासारख्या समुद्रकिनारी मृत माश्याचा मोठा खच आढळून आला आहे शासनाने दिलेल्या निर्देशानुसार रसायन युक्त पाणी हे सरळ कोणत्याही समुद्र नदी नाल्यात न सोडता त्यावर प्रक्रिया करून मगच ते पाणी सोडावे असे असतानाही पाणी सरळ समुद्रात सोडण्यात येते ह्यावर स्थानिक प्रशासन नजर अंदाज का करते ? असा प्रश्न स्थानिक विचारत आहे.
सदर किनारपट्टीवर मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांच्या जीवाशी हा खेळ नाही का ?
मागील दहा वर्षात वाढत्या घातक रासायनिक जल प्रदूषणामुळे वारंवार माशांचा मृत्यू, पक्षांचा व जनावरांचा मृत्यू होत आहे याकडे मनुष्यबळ व यंत्रणांची कमतरता असल्याचे कारण देऊन सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे
संतप्त नागरिक हैराण झाले असून ह्याबाबत आवाज उठवून किंवा मोर्चाकाढून पण ह्यांना काहीच फरक पडत नाही ह्यावर प्रशासनाने आळा घातलीच पाहिजे आणि कोळीलोकांच्या कुटूंबाना उध्वस्त होण्यापासून वाचवलं पाहिजे
दांडी गावातील स्थानिकाची प्रतिक्रिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button